ग्रो वर ९,५३८,६०९, सध्याचे सक्रिय ग्राहक . ग्रो या ब्रोकर फर्म ची स्थापना २०१६ रोजी करण्यात आली. ग्रो वर खाते उघडणे अगदी सोपे आहे, नाव, पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि मोबाइल नंबर, ही माहिती पुरवून तुमचे खाते काही मिनिटात उघडले जाईल. ग्रो वर तुम्ही स्टॉक्स ची खरेदी, स्टॉक ट्रेडिंग,व म्यूचुअल फंड द्यावरे गुंतवणूक सुद्धा करू शकता. ग्रो वर SIP मार्गाने सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता.
२. ZERODHA
ZERODHA, झेरोधा वर सध्याचे अॅक्टिव ग्राहक ७,२८७,१४८ आहेत, ग्रो या ब्रोकर फर्म ची स्थापना
१५ ऑगस्ट २०१0 रोजी करण्यात आली. या app चे इंटिरियर सामान्यांना लगेच समजेल व उमजेल अश्या सोप्या पद्धतीत डिजाइन केले आहे, झेरोधा चे संस्थापक नितिन कामठ व निखिल कामठ सध्या कार्यरतआहेत. झेरोधा वर खाते उघडणे अगदी सोपे आहे, नाव, पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि मोबाइल नंबर, ही माहिती पुरवून तुमचे खाते काही मिनिटात उघडले जाईल.
३. Angel One
Angel one, एंजेल वनवर सध्याचे अॅक्टिव ग्राहक ६,१११,८७९ आहेत. एंजेल वन ची स्थापना ८ ऑगस्ट १९९६
रोजी करण्यात आली होती. एंजेल वन सध्याचे टाटा आयपीएल(Tata IPL) चे स्पॉन्सर आहेत, हा ब्रोकर
तुम्हाला गुंतवणूक, IPO, म्यूचुअल फंड, Futures व options व परदेशातल्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूकची
संधी देतो, एंजेल वन चे संस्थापक दिनेश ठक्कर सध्या कार्यरत आहेत.
४. UPSTOX
UPSTOX, वर सध्याचे अॅक्टिव ग्राहक २,५१६,६४७ आहेत. UPSTOX ची स्थापना २००९ मध्ये RKSV सिक्युरिटीज
म्हणून झाली. इथे खाते उघडणे सहज शक्य आहे आणि ते पण क्षणात. UPSTOX च्या माध्यमातून तुम्ही IPO,
म्यूचुअल फंड, Futures व options व परदेशातल्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करू शकता, या मध्ये तुम्ही सोने
सुद्धा digitally खरेदी करू शकता. खाते उघडण्यासाठी नाव, पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड,
आणि मोबाइल नंबर ची गरज भासेल.
५. ICICI DIRECT
ICICI DIRECT, १९ लाख अॅक्टिव users आहेत. या ब्रोकर फर्म ची स्थापना २००० साली केली आहे. तुम्ही
खुशाल इथे आपले खाते उघडू शकता, नावाजलेली बँक आणि बँक द्वारे निर्माण केलेली ही सुविधा. गुंतवणूक सध्या
खुप गरजेची आहे आणि वरील दिलेल्या कुठल्याही ब्रोकर सोबत तुम्ही जुळू शकता.
तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि तुमचा योग्य ब्रोकर निवडा.
मूल्यवान सल्ला: स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या व तत्ज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
लेखक- आशिष दिपक पेडणेकर.